-->

कूकर शिर कारा परै, गिरै बदन ते लार।

फ्यूचर लाइन टाईम्स 


कृमिकुलचितं लालाक्लिंन्नं विगन्धि जुगुप्सितं
निरुपमरसप्रीत्या खादन्नरास्थि निरामिषम्।
सुरपतिमपि श्वा पार्श्वस्थं विलोक्य न शङ्कते
न हि गणयति क्षुद्रो जन्तु: परिग्रहफल्गुताम्॥२७॥


'नीतीशतक', राजा भर्तृहरी.


वृत्त : हरिणी


{राजा भर्तृहरि कृत नीतिशतक मानशौर्यप्रशंसा विषयविभाग}


अर्थ : किड्यांनी बुजबुजलेले, लाळेने लडबडलेले, घाण वास असणारे दुर्गंधीयुक्त, किळसवाणे, मांसरहीत असे माणसाचे हाड, मिटक्या मारीत खाणारे कुत्रे अगदी देवाधिदेव इंद्र जरी शेजारी असला तरी आरामात ते हाड एखाद्या मिष्टान्नाप्रमाणे चघळत बसते. यत्किंचितही लाजत नाही. खरोखरच, क्षूद्र स्वार्थ असणार्‍यांना त्यांच्या त्या स्वार्थातला फोलपणा लक्षात येत नाही. 


टीप : अतिशय क्षूद्र असा स्वार्थ असणारी लोकं त्या क्षूद्र अशा स्वार्थासाठी वाटेल ते करतात तसे करताना त्यांना त्यातील फोलपणा त्यांच्या लक्षात येत नाही आणि करत असलेल्या कृत्याची लाजही वाटत नाही.


या विषयावरच दोहा व रोला या छंदांचे मिश्रण असलेली एक कुण्डलिया आहे ती अशी,


कूकर शिर कारा परै, गिरै बदन ते लार।
बुरौ बास बिकराल तन, बुरौ हाल बीमार।।
बुरौ हाल बीमार, हाड सूखे को चाबत।
लखि इंद्रहु को निकट, कछु उर शंक न लावत।।
निठुर महा मनमांहि, देख घुर्रावत हूकर।
तैसे ही नर नीच, निलज डोलै ज्यों कूकर।।


वरील श्लोक 'हरिणी' या अक्षरगण वृत्तामधे रचलेला अाहे.
गणक्रम : न स म र स लगा
लघुगुरूक्रम : ललल ललगा गागागा गालगा ललगा लगा


 


एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ