-->

भागवत स्कंध. ७-५

नैषांमतिस्तावदुरुक्रमाङिंघ्र स्पृशत्यनर्थापगमोयदर्थः ।
महीयसां पादरजोऽभिषेकं निष्किंचनानां न वृणोंतयावत् ॥


भक्तश्रेष्ठ प्रल्हादाचे उद्‌गार आहेत, तो म्हणतो, ज्याची बुद्धिभगवच्चरण कमलाला स्पर्श करते. त्यांच्या जन्म मृत्युरूप अनर्थाचा सर्वथा नाश होतो, परन्तु जे लोक अकिंचन भगवतप्रेमी महात्म्याच्या चरण धूलीत स्नान करीत नाहीत त्याची बुद्धि काम्यकर्माचे आचरण करीत असताही भगवच्चरणाचा स्पर्श करू शकत नाही म्हणजे भगवच्चरणाचा लाभ होत नाही
श्रीधर कुलकर्णी
ज्ञानामृत मंच समुह


एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ